Posts

Showing posts from July, 2019

टिळकांच्या पुतळ्यासमोर

Image
टि ळ कांच्या पुत ळ्या समोर         ‘ टि ळ कांच्या पुत ळ्या जव ळ ’ ही कवि कुसुमाग्रज यांची १९४६ मधील कविता . एकेका ळी क्रमिक पुस्तकात समाविष्ट असल्याने जास्त प्रसार असलेली. गिरगांव चौपाटीवरील पुत ळ्या चा स्पष्ट संदर्भ असणारी ही कविता अस्वस्थ वर्तमानाबाबत (कदाचित फा ळणी पूर्व भारत) कवीच्या मनात उठलेले काहूर , टि ळ कां चे उग्र , ऊत्तुंग पण आश्वासक व्यक्तिमत्व आणि तुलनेत सामान्य जनतेचे निम्न जीवन या विविध भावना प्रगट करते. लोकमान्य टि ळ कांच्या स्मृतीशताब्दीस सुरूवात होत असताना या कवितेची आठवण होणे स्वाभाविक आहे. कुणाच्याही मरणाला शंभर वर्षे उलटल्यावर त्याचे व्यक्तिगत गुणविशेष कांहीसे मागे पडतात. जुन्या का ळा तील नामवंतांच्या बाबतीत तर प्रखर ध्येयनिष्ठा , नि:स्वार्थी स्वभाव , परकीय सत्तेस विरोध आणि अविरत कार्यमग्नता असे गुणविशेषही सामान्य घटक ठरत असल्याने त्यांचे वैशिष्ठ्य अधोरेखित नमूद करण्यास कदाचित ते अपुरे ठरतील. राजकीय कार्याव्यतिरिक्त इतर विषयांत – वैचारिक/ललित लेखन , पत्रकारिता , ग्रंथ रचना - रस/नैपुण्य असणे हा विशेष देखील अनेक ने...

बँक राष्ट्रीयीकरणाचे धडे

बँक राष्ट्रीयीकरणाचे धडे        पन्नास वर्षापूर्वी १९ जुलै , १९६९ ला अमेरिकेने चंद्रावर पहिला मानव उतरवला. त्यामु ळे १९५७ साली पहिला रशियन उपग्रह अंतरा ळा त भ्रमण करू लागल्यावर निर्माण झालेल्या स्पर्धात्मक वातावरणात अमेरिकेने आघाडी मि ळ वल्याचे चित्र दिसले तरी चांद्रमोहिमेने अंतरा ळ , वहातूक , दूरसंचार , हवामान , पर्यावरण अशा विविध क्षेत्रात संशोधनाला मोठी चालना मि ळा ली ज्याचे सुपरिणाम सर्व जगावर होत गेले.त्यातील बरेच आज सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग बनले आहेत. १९ जुलै , १९६९ याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यानी १४ प्रमुख व्यापारी बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला. या निर्णयाला कॉंग्रेस पक्षांतर्गत संघर्षाची पार्श्वभूमी होतीच. आर्थिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी बॅंक राष्ट्रीयीकरणाची आवश्यकता सरकार दरबारी तत्वत: मान्य असली तरी या निर्णयाचे तात्कालिक कारण राजकीयच होते.         पन्नास वर्षापूर्वीच्या चांद्र मोहिमेचे सुपरिणाम व्यापक स्वरूपात समस्त मानवजातीच्या अनुभवास आले तसेच बॅंक राष्ट्रीय...