Posts

Showing posts from March, 2020

अंतरे; भौगोलिक आणि सामाजिक

Image
अंतरे ; भौगोलिक आणि सामाजिक       को विद -१९ चा जगभर प्रसार होण्यात चीनच्या भूमिकेबाबत ज्या शंका घेतल्या जात आहेत त्यांचे निरसन होउन सत्य स्थिती स्पष्ट होण्यास बराच का ळ लागेल. हे जागतिक संकट आधुनिक का ळा तील एक मोठे आणि व्यामिश्र संकट आहे अशीच याची नोंद होईल. आर्थिक परिणामांच्या बाबतीत वर्तमान आरिष्ठ १९३० च्या जागतिक मंदी पेक्षाही तीव्र असेल असे दिसते. परस्परावलंबी जगात या संकटाचा सामना करताना विविध देशांतील धोरणांत सहकार्य असणे तर आवश्यक आहेच पण देशी धोरणे आखताना ती लोकांना समजावणे आणि या धोरणांचे विविध स्तरावर लोकांच्या वागणूकीवर काय परिणाम होतील यांचाही विचार करण्याची गरज समोर येत आहे.       कोविद-१९ चा प्रादुर्भाव अडवण्याच्या संदर्भात सामाजिक व्यवहार करताना किमान अंतर राखण्याचा ( Social Distancing ) मुद्दा पुढे आला. सार्वजनिक ठिकाणी माणसे एकमेकांपासून किमान १ मीटर अंतरावर सदैव राहिली तर करोनाचा प्रसार होण्यास कांहीसा आ ळा बसेल अशी भूमिका यामागे आहे. अजून या साथीवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने , तिचा प्रसार होण्यात अडथ ळे आणले तर साथीचा प्रसार मंद होण्यानेही

जागतिकीकरण आणि कोविद-19

Image
जागतिकीकरण आणि कोविद-19            जागतिकीकरण आणि साथीच्या रोगांचा संबंध खूप जुना आहे. इ.स. १४९२ मध्ये कोलंबस अमेरिकेच्या किना-यावर पोचल्यावर या युरोपीय दर्यावर्दीनी त्यांच्या बरोबर आणलेल्या विषाणूंच्या प्रभावाने तिथले अनेक स्थानिक (रेड इंडियन्स) लोक मृत्युमुखी पडले!. नंतरच्या ५२५ वर्षात वैद्यकीय तंत्र आणि जागतिकीकरण यांत अर्थातच मोठे बदल झाले आहेत. त्यापरिणामी साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. जागतिकीकरणामु ळे विविध देशांमधील वस्तु , सेवा आणि भांडवल यांची देवाण घेवाण तर वाढली आहेच पण आंतराष्ट्रीय प्रवासही सुलभ झाल्याने व्यापार , पर्यटन , शिक्षण यासाठी होणारा प्रवास प्रचंड वाढला आहे. या सर्वाचा प्रभाव डिसेंबर अखेरीस चीनच्या हुआन प्रांतात प्रथम प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार ज्या पद्धतीने जगभर झाला/होत आहे त्यावर दिसून येतो. कोरोना हा विषाणू नवा नसला – आपल्या सर्वाच्या परिचयाच्या Dettol वरही ते कोरोना विषाणूचा नायनाट करते असा दावा केलेला असतो - तरी सध्या त्याच्या ज्या विकाराने प्रथम चीनमध्ये थैमान घातले आणि ज्याची आता सर