Posts

Showing posts from March, 2019

चांगले का वेगळे?

चांगले का वेग ळे ? २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू असताना २०१४ च्या निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला स्पष्ट बहुमत मि ळण्याची कारणे कोणती असा प्रश्न विचारणे कदाचित निरर्थक वाटले तरी महत्वाचे आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणात गुरफटले असून पंतप्रधान मौन धारण करून बसल्याने प्रशासन ठप्प झाले आहे अशी परिस्थिति दिसत असताना मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप कांही चांगला आणि निराळा कार्यक्रम राबवेल अशी सामान्य मतदारांची धारणा बनली होती॰   आणि भाजप ने अच्छे दिन , सबका साथ सबका विकास अशा घोषणा देत असतानाच भ्रष्टाचार नष्ट करण्याचा आपला उद्देश जाहीर केल्याने कोणत्याही एका पक्षाचे खंदे समर्थक नसलेल्या मतदारानी भाजपला आपला कौल दिल्याने , ३४-३५% मते मिळाली तरी निम्म्यापेक्षा अधिक जागा मिळवण्यात भाजप यशस्वी झाला असे मानले तर केंद्र सरकारची गेल्या पांच वर्षातील कामगिरी चांगली व/वेगळी होती का असा विचार करणे उपयुक्त ठरेल. सरकारची कामगिरी चांगली होती का नाही याचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणे कठीण असले तरी ती वेगळी/ निराळी होती का असा विच