Don Jahirname
दोन जाहीरनामे प्रथम कॉंग्रेस आणि पाठोपाठ भाजपने आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. निवडणूक जिंकून आपला पक्ष सत्तेवर आल्यास सत्तेचा उपयोग कोणती उद्दीष्ठे साध्य करण्यासाठी होईल व त्यासाठी कोणती धोरणे आखली जातील याची ढोब ळ दिशा जाहिरनाम्यात दर्शवली जाईल आणि निवडणूक प्रचारात हे(च) मुद्दे वापरले जातील अशी सामान्य अपेक्षा असते. शिवाय एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर घोषित उद्दीष्ठे प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न त्या पक्षाच्या सरकार मार्फत होणेही अपेक्षित असते!. मतदारानाही आपला मतदानाचा हक्क बजावताना विविध पक्षांचे जाहिरनामे उपयुक्त ठरू शकतात. पण प्रत्यक्षांत तसे झाले नाही तर जाहीरनामे निरूपयोगीच ठरतील. ४५ पृष्टांच्या भाजप जाहिरनाम्यात अनेक उद्दीष्ठे नमूद केली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा , शेती , युवक , सुप्रशासन , महिला सक्षमीकरण , परराष्ट्र धोरण , सांस्कृतिक वारसा अशा बारा ठ ळ क शीर्षकांखाली तब्बल २१० विविक्षित उद्दीष्ठे पुढील पांच वर्षात साध्य करायचा भाजपचा संकल्प आहे. त्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मि ळू न लवकरच ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने पक्ष आणखी ७५ लक