मोदीविजय
मोदीविजय लोकसभा निवडणूक २०१९ चे विश्लेषण अजून बराच का ळ होत राहील. २०१८च्या शेवटी झालेल्या विधानसभा निवाडणूकात भाजपची लक्षणीय पिछेहाट झाल्यामु ळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपला कठीण जाईल असा स्वत: भाजप आणि इतर सर्व विरोधी पक्ष यांचा ठाम विश्वास होता. मात्र तो फोल ठरल्याने मोदीविजय अधिक नेत्रदीपक भासत आहे. सत्तास्थापनेच्या संदर्भात किती जागा जिंकल्या याला सहाजिकच महत्व प्राप्त होते. भाजपला गेल्या निवडणूकीत २८२ जागा मि ळाल्या ; त्यात २१ जागांची भर घालत आपल्या निर्विवाद बहुमताचा पल्ला भाजपला अजून वाढवता आला ही बाब निसंशय महत्वाची आहे. पण भाजपच्या ४०/५० जागा कमी होतील याची ठाम खात्री असल्याने निकलानंतर भाजच्या जागा ६०/७० ने वाढल्या असे चित्र बनले. विजयी पक्ष नेहमीच आपल्या विजयाची व्याप्ति जास्त दाखविण्याचा प्रयत्न करतो. खुद्द नरेंद्र मोदी यांनी २३ मेला पक्ष कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात आपल्या पक्षाला दिलेल्या पाठिंब्या बद्दल देशातील समस्त १३० कोटी जनतेचे आभार मानले. या निवडणूकीतून ‘ नकली ’ धर्मनिरपेक्षतेचे महत्व संपले आहे आणि जातीच्या नावे मते मागणा-यांची सद्दी संपली आहे अ