Posts

Showing posts from October, 2019

२०१९ अर्थशास्त्र नोबेल आणि प्रायोगिक अर्थशास्त्र

Image
२०१९ अर्थशास्त्र नोबेल आणि प्रायोगिक अर्थशास्त्र          २०१९ चे अर्थशास्त्रातील नोबेल परितोषिक अभिजीत बॅनर्जी , एस्थर डफ्लो आणि मायकेल मार्केल यांना संयुक्तपणे मि ळा ले आहे. विजेत्या अर्थतज्ञांत भारतात शिक्षण घेतलेले ( मुंबईत जन्मलेले) , पण आता अमेरिकन नागरिक बनलेले अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या फ्रेंच/अमेरिकन पत्नी एस्थर डफ्लो यांचा समावेश असल्याने या तिघांच्या अभ्यास विषयात भारतीयांना अधिक रस वाटेल. अशाच कारणामु ळे बंगाली लोकाना , आणि त्यातही कलकत्तावासियाना , या सन्मानाबाबत अधिक आनंद होईल. मात्र विजेत्यात भारतीय वंशाची व्यक्ति असण्याबरोबरच या तिघांचा अभ्यासविषय दारिद्र्य निवारण आणि त्यासाठी संभाव्य परिणामकारक हस्तक्षेप ठरविणे असा असल्यानेसुद्धा भारतात त्यांच्या कामगिरीबाबत जास्त रस/उत्सुकता असावी. गरीबी निवारण आणि त्यासाठी कोणती धोरणे यशस्वी ठरतात याबाबत विकासाच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक सातत्याने लक्ष देत आहेत. २०१५ चा नोबेल पुरस्कार मि ळा लेल्या एंगस देतोन यांचा अभ्यासविषयही उपभोग , गरीबी आणि कल्याण असा होता. बॅनर्जी , डफेल आणि मार्केल यांनी संयुक्तपणे केलेल्य

आणखी एक बँक घोटाळा?

Image
आणखी एक बँक घोटा ळा ? वित्तीय संकटात अडकलेल्या बँका / बिगर बँक वित्तीय संस्थाची नवनवीन उदाहरणे नियमितपणे उघड होत असताना पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेचा घोटा ळा प्रकाशात आल्यावर सामान्य - या बँकेतील ठेवीदार आणि कर्मचारी वग ळ ता इतरांची - प्रतिक्रिया आणखी एक बँक घोटा ळा अशीच होईल. सरकारी मालकीच्या बँकांची थकित कर्जे आणि घोटा ळ्यांच्या तुलनेत पीएमसी प्रकरण लहानच आहे. पण रिझर्व बँकेने जारी केलेल्या निर्बंधामु ळे त्रस्त झालेले ठेवीदार पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या , मेहूल चोक्सी अशी अधिक मोठी (आणि रंगतदार !) प्रकरणे उघडकीस येऊनही ठेवी काढण्यावर कोणतीच बंधने नसताना या प्रकरणात रिझर्व बँकेने घिसडघाई केली आहे अशी तक्रार दूरदर्शनच्या कॅमे-या समोर करत असलेले पाहताना टॉलस्टाय यांच्या ‘ अना कॅरेनिना ’ या कादंबरीमधील “ सर्व सुखी कुटुंबे एक सारखी असली तरी असमाधानी कुटुंबांच्या असमाधानाचे कारण निरा ळे असते ” या सलामीच्या वाक्याची आठवण येत होती. बँक घोटा ळ्याच्या सर्व प्रकरणात ठेवींची सुरक्षितता आणि उपलब्धता हा समान मुद्दा असला तरी प्रत्येक घोटाळ्यातील क