शांतता आणि न्याय
शांतता आणि न्याय रामजन्मभूमि - बाबरी मशीद जमीन वादात सर्वोच्च न्यायालयाने ( भारतीय ९/११ ला ) दिलेल्या निर्णयाने अनेक भारतीय नागरिकानी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणानी बंदोबस्त वाढवला होताच पण शांतता राखली जाण्याचे श्रेय प्रशासनास द्यायचे का न्यायालयाला हे ठरविणे कठीणच आहे. सामान्यत: कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम प्रशासनाचे आणि विधिमंड ळा ने संमत केलेल्या कायद्यांच्या अर्थाबाबत तंटा बखेडा उदभवल्यास त्यात न्याय निवाडा करणे ही न्यायालयांची जबाबदारी असते. रामजन्मभूमि बाबरी मशीद प्रकरणात प्रशासनाने आपल्या कामात कुचराई करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. हिंदु मुसलमान समुहात वारंवार भांडणे होत असल्याने १८५७ साली इस्ट इंडिया कंपनीने इमारतीचा मुख्य भाग (मशीद) आणि बाहेरचे आवार- येथील राम चबूतरा , सीता रसोई भागात पुजापाठ होत असे- एक भित बांधून निरा ळा केल्यापासून मशीदीत नमाज आणि बाहेर पूजापाठ चालू असे. डिसेंबर १९४९ मध्ये बालरामाच्या मूर्ती जबरीने मशीदीच्या मध्यवर्ती घुमटात ठेवण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने हा भाग कुलुप ब