नवे नागरिकत्व ?
नवे नागरिकत्व ? आपल्या निवडणूक वचननाम्यात नमूद केल्याप्रमाणे भाजपने तांतडीने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकास संसदेची मान्यता प्राप्त करून घेतल्यानंतर लगेचच आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यात अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाल्याने नागरिकत्व दुरूस्ती कायदा (नादुका) आणि सध्या आसाममध्ये अंमलबजावणी सुरू असलेले राष्ट्रीय नागरिक नोंदणी पत्रक ( National Citizen Register) यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. आता असंतोष इतरत्रही पसरल्याने नादुकाशी निगडित नागरिकत्व , धर्म आणि स्थलान्तर या तीन घटकांचा विचार करणे योग्य ठरेल. स्थलान्तर आदिम कालापासून माणसांचे समूह स्थलान्तर करत आले आहेत. एखाद्या ठिकाणी रहाणे कठीण झाले की नवी सोईस्कर जागा शोधली जाई. आता मानवी समुहांची लक्षणीय प्रगती झाली असली तरी स्थलांतराची मूल प्रेरणा कायम आहे. उपजीविकेच्या सरस साधनासाठी व्यक्तिश: किंवा सामूहिकरित्या आजही स्थलांतरे होतातच. राज्यराष्ट्रे उदयाला आल्यानंतर स्थलान्तर राष्ट्रीय का आंतरराष्ट्रीय ही बाब कायदेशीर महत्वाची बनली. पण चांगल्या जीवनमानाच्या शोधाची मूल प्रेरणा आंतरराष्ट्रीय सीमा निर्माण