कवितेचा अर्थ
CAA आणि NCR विरोधी निदर्शनांमध्ये फैझ अहमद फैझ यांच्या हम देखेंगे या कवितेचे वाचन/गायन करण्यात आले . अशा प्रसंगी गाणी , नाच अशा समूह कृति प्रत्यही केल्या जातात. या कवितेचा वापर होण्याचे मुख्य कारण असे की १९७९ च्या सुमारास लिहिलेल्या पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक़ यांच्या राजवटी विरोधी निदर्शनात तिचा वापर करण्यात आला. या कवितेवर पाकिस्तानात बंदी घातली गेली आणि सहाजिकच तिची लोकप्रियता वाढली. अनेक गायकानी ती गायली आहे. CAA आणि NRC ला विरोध करणा-याना ती का भावली हम देखेंगे लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है जो लोह-ए-अज़ल [1] में लिखा है जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2] रुई की तरह उड़ जाएँगे हम महकूमों [3] के पाँव तले ये धरती धड़-धड़ धड़केगी और अहल-ए-हकम [4] के सर ऊपर जब बिजली कड़-कड़ कड़केगी जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से सब बुत [5] उठवाए जाएँगे हम अहल-ए-सफ़ा [6] , मरदूद-ए-हरम [7] मसनद पे बिठाए जाएँगे