दूरसंचार पेच आणि सुशासन
दूरसंचार पेच आणि सुशासन एकेका ळी सरकारच्या स्ंपूर्ण स्वामित्वा खाली असलेले दूरसंचार ( Telecom) क्षेत्र आता पूर्णपणे बदलले आहे. सरकारची मालकी , सेवांचे स्वरूप , किंमती आणि त्यांचा विस्तृत वाढता वापर या अनेक निकषांवर दूरसंचार क्षेत्रातील बदल लक्षणीय आहेत. सरकारी विभागाचे कंपनीकरण , खाजगी आणि परकीय कंपन्याना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन आणि गतिमान तांत्रिक बदलांचे परिणाम सामान्य लोकांना उचित किंमतीस प्राप्त होणे या बाबी गेल्या वीस वर्षात प्रचंड वेगाने घडल्या. सातत्याने स्वस्त (आणि मस्त!) होणारे मोबाइल फोन , विविध सेवांच्या घसरणा-या किंमती यामु ळे दूरसंचार सेवांचा उपयोग वाढला. एकेका ळी फक्त संभाषणासाठी उपयोगी पडणारा ‘ तारा ’ किंत फोन आता हुशार आणि चल झाला असल्याने त्याचा उपयोग गाणी , सिनेमा , दूरदर्शन , पुस्तक वाचन , खरेदी अशा अनेक सोयीसाठी करणे शक्य झाले आहे. हा अवांतर उपयोग एवढा व्यापक बनला आहे की संभाषण हा त्याचा मुख्य उपयोग विसरला जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील बदलांचे परिणाम बँक सेवा , व्यापार , रेल्वे , हॉटेल अशा विविध क्षेत्रात दूरसंचार आणि संगण