कोविद-१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ?
कोविद-१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ? कोविद१९ च्या महामारी विरूद्ध भारताने युद्ध पुकारून एक महिना पूर्ण झाल्याने या का ळा तील अनुभवाधारे भविष्याचा वेध घेण्याचे प्रयत्न आता होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘ मन की बात ’ या कार्यक्रमात जनतेने यापुढेही सावधगिरी बा ळ गण्याची आवश्यकता मांडतानाच भविष्यात ‘ मास्क ’ हा सामान्य , आणि सन्मान्य , पेहरावाचा भाग बनेल अशी शक्यता वर्तवतानाच तिची आवश्यताही त्यांनी अधोरेखित केली. वैयक्तिक आचरणात अजून कांही बदल (उदा . सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे , वारंवार हात धुणे) होणेही आवश्यक ठरेल. भविष्यात महामारीच्या प्रसंगाचा सामना करण्यास असे बदल आवश्यकच ठरतील. पण सामुहिक पात ळी वर कोणते धोरणात्मक वर्तणूक बदल आवश्यक ठरतील याचा वेध घेणे अधिक गुंतागुंतीचे ठरते. शिवाय कोविद१९ चा प्रकोप आणि परिणाम अजून चालू असल्याने या अनुभवाचाच अधिक तपशीलवार , विविध अंगानी विचार करणेही अशा भविष्यातील शक्य /आवश्यक बदलांचा वेध घेण्यास उपयुक्त ठरेल. कोविद१९ चा प्रसार भिन्न राज्यात ज्या वेगाने झाला तो समान नव्हता. शिवाय विविध राज्यात ज्या सम