Posts

दूरसंचार पेच आणि सुशासन

Image
दूरसंचार पेच आणि सुशासन         एकेका ळी  सरकारच्या स्ंपूर्ण स्वामित्वा खाली असलेले दूरसंचार ( Telecom) क्षेत्र आता पूर्णपणे बदलले आहे. सरकारची मालकी , सेवांचे स्वरूप , किंमती आणि त्यांचा विस्तृत वाढता वापर या अनेक निकषांवर दूरसंचार क्षेत्रातील बदल लक्षणीय आहेत. सरकारी विभागाचे कंपनीकरण , खाजगी आणि परकीय कंपन्याना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन आणि गतिमान तांत्रिक बदलांचे परिणाम सामान्य लोकांना उचित किंमतीस प्राप्त होणे या बाबी गेल्या वीस वर्षात प्रचंड वेगाने घडल्या. सातत्याने स्वस्त (आणि मस्त!) होणारे मोबाइल फोन , विविध सेवांच्या घसरणा-या किंमती यामु ळे दूरसंचार सेवांचा उपयोग वाढला. एकेका ळी फक्त संभाषणासाठी उपयोगी पडणारा ‘ तारा ’ किंत फोन आता हुशार आणि चल झाला असल्याने त्याचा उपयोग गाणी , सिनेमा , दूरदर्शन , पुस्तक वाचन , खरेदी अशा अनेक सोयीसाठी करणे शक्य झाले आहे. हा अवांतर उपयोग एवढा व्यापक बनला आहे की संभाषण हा त्याचा मुख्य उपयोग विसरला जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील बदलांचे परिणाम बँक सेवा , व्यापार , रेल्वे , हॉटेल अशा विविध क्ष...

खुली गुंतवणूक आणि नियंत्रित व्यापार

Image
खुली गुंतवणूक आणि नियंत्रित व्यापार        १ फेब्रुवारीला संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाला मंदावलेली उत्पन्न वाढ , घटलेली खाजगी गुंतवणूक आणि खालावलेली निर्यात अशी पार्श्वभूमी असली तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात या समस्यांची कारणमीमांसा तर सोडाच पण साधा उल्लेखही नव्हता. शिवाय संसदेतील अर्थसंकल्पीय चर्चेचे उत्तर देताना अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे असा विश्वास अर्थमंत्र्यानी व्यक्त केला असला तरी तो विरोधकाना चोख प्रत्युत्तर देण्याच्या त्यांच्या रणनितीचा एक भाग असावा. कारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक दिवस आधी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात सध्याचे (आंतरराष्ट्रीय) व्यापार वातावरण आणि परिणामी कुंठित झालेली निर्यात आणि बँक आणि वित्तसंस्थांचे अनारोग्य ही दोन कारणे वर्तमानातील मंद आर्थिक वाढीच्या संदर्भात नमूद केली होती. अर्थसंकल्प सादर होउन आता दोन आठवडे उलटले असले तरीही त्याचा विचार वरील दोन मुद्दयांच्या संदर्भात करता येईल. जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत       मंद गतीने वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था आणि अमेरिका चीन यांच...