लेह-लडाख-२

लेह-लडाख-२


        लेह - लडाखच्या अलीकडील प्रवासाविषयीच्या या लेखनास लेह–लडाख -२ असे शीर्षक देण्याचे कारण असे की लेखकाचा हा दुसरा प्रवास आहे.  पहिला प्रवास जून/जुलै २००८ मधील तर दुसरा जून २०१९ चा. अकरा वर्षानंतर लेह – लडाखला पुन्हा भेट देताना जाणवलेले बदल नमूद करणे हा या लेखनाचा मुख्य उद्देश. कांही बाबी अर्थातच अजिबात बदललेल्या नाहीत. समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या या प्रदेशात प्राणवायुचे प्रमाण कमी असल्याने थोडीशी जलद हलचाल झाली तरी लगेच होणारी दमछाक, स्वच्छ आल्हाददायक वातावरण आणि हिमाच्छादित शिखरांचे दृश्यसान्निध्य या बाबी अजून कायम आहेत! आल्हाददायक वातावरणाचा उल्लेख अर्थात सामान्य पर्यटक जातात त्या जून – सप्टेंबर या वसंतऋतूमधील काळापुरताच आहे ! पण हिवाळ्यात सर्वत्र बर्फ पसरले की निर्माण होणारी अतिथंडी आणि कायम वास्तव्य असलेल्या नागरिक /कर्मचा-यांचे बाह्य संपर्कशून्य आणि म्हणून कंटावाणे जिणे यातही कांही बदल झालेला नाही हे नक्की. मात्र न बदललेल्या या कांही बाबी वगता झालेले बदलही लक्षणीय आहेत.
        पर्यटनाच्या सोयी वाढलेल्या आहेत. अकरा वर्षापूर्वी दिल्ली - लेह अशी सकाळी येणारी एकच विमान सेवा उपलब्ध होती.  आता मुंबई, दिल्ली आणि श्रीनगर शहरातून विविध कंपन्यांच्या सेवा उपलब्ध आहेत. मात्र अजूनही या सेवा सका पुरत्याच मर्यादित आहेत कारण लेह येथील विमानतमुख्यत: लष्करी स्वरूपाचा आहे. या विस्तारित विमानसेवेचा उपयोग पर्यटक मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. मुंबईहून पहाटे चार वाजता सुटलेले लेह- श्रीनगर विमान पुरेपुर भरलेले होते आणि बहुसंख्य प्रवासी लेहला उतरले. विमानसेवांचा आता विस्तार झाला असला तरी अजूनही रस्ते हेच वाहतुकीचे – माल आणि प्रवासी – मुख्य साधन आहे यांत कांहीच आश्चर्य नाही.  आणि लेहला विमानातून उतरलेले प्रवासी देखील त्यांचा पुढील प्रवास रस्त्यानेच करतात!
        रस्तेबांधणी आणि देखरेख ही कामे Border Road Organization (BRO) मार्फत होतात ही बाब सर्वत्र दिसणा-या घोषणातून स्पष्ट होते. गेल्या अकरा वर्षात रस्त्यांची स्थिति सुधारली आहे का यांचे सामान्य (आणि सर्वमान्य) उत्तर देणे कठीण असले तरी मोठ्या प्रमाणात रस्ता रुंद करण्याचे प्रयत्न झाले असून -विशेषत: धोकादायक वणांवर ते अतिशय उपयुक्त ठरतात. येथे रस्ता दुरुस्ती हे काम सातत्याने करावे लागते आणि प्रवासा दरम्यान याची लक्षणे - कामगार आणि रस्ते दुरुस्तीची उपकरणे यांच्या वाहतूकीतून - दिसतात. सामान्यपणे असे विधान रस्ते दुरुस्तीतली अकार्यक्षमता किंवा भष्टाचार यांचे गमक मानले जाईल! मात्र इथे अस्थिर आणि अशांत हिमालयापासून रस्ते सुरक्षित राखण्याचे आव्हान आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे BRO च्या अथक प्रयत्नाचे अस्तित्व प्रवासात जसे सतत जाणवते तसेच त्यांचे अपुरेपणही!
पर्यटक
        पर्यटकांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. पण वाढत्या संख्येबरोबर पर्यटकांचे स्वरुपही बदलत असावे. २००८ सालीही, कारगिल येथे युद्ध स्मारक उभारले गेल्यावर या स्मारकाला भेट देण्याच्या खास सहली निघण्यास सुरुवात झाली होती. तो पर्यंत लेह - लडाखला भेट देणारे प्रवासी मुख्यत: तरुण, साहसाची आवड (आणि कुवत) असलेले असे असत. सायकल/मोटार सायकलवर आपले सामान आणि आपतकालीन स्थितीत उपयोगी पेट्रोलचा डबा लादून लडाखचा भ्रमण करणारे लोक तेथे नेहमीच जात असत आणि त्यांची संख्या वाढणे सहाजिक आहे. हिमालयातील प्रवासी हंगाम बर्फ वितण्यास सुरूवात झाल्यावर जून पासून सुरू होतो तो ऑक्टोबर पर्यंत चालू असतो. शिवाय हिवाळ्यात बर्फमय मार्गावरुन गिर्यारोहण/पदभ्रमण करणारे धाडसी पर्यटक येतात यात मुख्यत: युरोपीय/अमेरिकन असतात हे निरीक्षण २००८ साली ऐकले होते आणि २०१९मध्येही ते पुन्हा कानावर पडले. पण कारगिल युद्धानंतर लेह लडाखच्या नियमित सहली सुरू झाल्यावर एकेकाळी फक्त खडतर वातावरणात पायी किंवा दुचाकीवर प्रवास करण्याचे साहस करण्याची तयारी असलेले पर्यटक येणा-या या प्रदेशात आता सामान्य पर्यटक येण्यास सुरूवात झाली आहे. विर हवामान असल्याने डॉक्टरचे सर्टिफिकेट, भीमसेनी कापराच्या वड्या, गरज पडली तर डायमॅक्स च्या गोळ्या आणि सुरूवातीला १/२ दिवस आराम करून नव्या वातावरणाची संवय या तयारीनिशी इतर सहलीप्रमाणेच  लेह लडाखची सहल करणारे यात्रिकही वाढत आहेत.  लेह विमानतळावर आगमन केलेल्या प्रवाश्याना ऑक्सिज़न सिलेंडर्स विकण्याचे - बव्हंशी यशस्वी – प्रयत्न होतात. त्यातील बरीचशी सिलेंडर्स
त्यांची गरज न पडल्याने सीलबंदच रहात असली तरी विमानातून त्यांच्या वाहतूकीस परवानगी नाही ही बाब परतीचे विमान पकडतानाच कानावर येत असल्याने ती फेकून द्यावी लागतात. आणि बहिर्गमन कक्षात ऑक्सिज़न सिलेंडर्स विक्रेते नसतात हे सांगणे नलगे.
        २००८ साली मोबाईल फोन उपलब्ध झाले असले तरी ते हुशार (स्मार्ट) बनले नव्हते. पण आता ते  हुशार झाल्याने आणि त्यांची सुलभ उपलब्धता असल्याने, स्थिर फोटो किंवा चलत चित्रफीत बनविणे आणि फ़ेसबुक / व्हाट्स ऍप मार्फत ते त्वरित प्रसृत करणे या गोष्टी शक्य, सोप्या आणि जव जव मोफत बनल्या आहेत. फोटो काढणे ही बाब एवढी सामान्य झाली आहे की प्रवासी मार्गदर्शक अमुक ठिकाणी तुम्हाला दहा मिनिटे फोटोग्राफीसाठी मितील अशीच सूचना देतात! विशिष्ट स्थळाची माहिती देणारे फलक पुरातत्व विभाग किंवा तत्सम संस्थानी लावलेले असतात ते वाचण्यात वे न घालवता त्याचा फोटो काढून ठेवण्याची नवीन टूम प्रस्थापित झाली आहे. 
        लडाख मधील प्रेक्षणीय स्थळात बुद्ध मठ; खार्दुंग-ला,  चांग-ला यासारख्या अति उंचावरील खिंडी, नुब्रा आणि इतर नदयांची खोरी या बरोबरीने पेंगॉग आणि त्सोमोरीरी यासारखे तलाव अशी कांही ठिकाणे आहेत. यापैकी पेंगोंग तलावाकाठी थ्री इडियट्स या सिनेमातील गोड शेवटाचा प्रसंग या नित पण जहाल खारट पाणी असलेल्या तलावाकाठी चित्रित झाल्याने हा तलाव आता जणू एक तीर्थक्षेत्र बनला आहे. या सिनेमाची नायिका करीना कपूर या तलावाकाठच्या चित्रीकरणात जी स्कूटर वापरते त्याचे मॉडेल तलावाकाठी - अर्थातच फोटो काढण्यासाठी- उपलब्ध आहे. याच सिनेमातील वांगड़ू यांच्या शाळेला प्रेरित करणारी खरी शाळा लेह जवच असून तेही एक पर्यटन स्थ बनले असून त्याच परिसरातील थिसके किंवा हेमीस बुद्ध मठांशी हा स्पॉट आताच स्पर्धा करत आहे! थ्री इडियट्स सिनेमाचे व्यावसायिक यश सर्वश्रुत आहेच. पण लडाख मधील पर्यटन व्यवसायास जे पाठब हा सिनेमा पुरवत असावा ते या चित्रपटाचा मोठा सामाजिक लाभ ठरू शकेल!!    
स्थलांतर
          परिवर्तनाचा जाणवलेला दुसरा महत्वाचा पैलू स्थालांतरित लोकांचे उघड अस्तित्व ! अर्थात लडाखी लोकांची विशिष्ठ चेहरेपट्टी आणि चण यामुळे बाहेरचे लोक चटकन उठून दिसतात हे खरेच आहे. पण आता पर्यटनात वाढ झाल्याने पर्यटनास आवश्यक सोयी/सुविधा यातही वाढ होणे गरजेचे ठरते. यात स्थालांतरितांचा सहभाग महत्वपूर्ण ठरत आहे. हुंगार येथील ज्या हॉटेलात आम्ही थांबलो तेथे व्यवस्थापकासकट सर्व कर्मचारी इतर राज्यातील होते. खुद्द व्यवस्थापक दार्जिलिंग मधील होता. पण तो पर्वतीय प्रदेशात असल्याने त्याला येथील वातावरण परिचयाचे असेल असे सुचविल्यावर त्याने दार्जिलिंग कसे निराळे आहे हे सांगायला सुरूवात केली. पण हे रोजगार केवळ पर्यटन हंगामापुरते ४ /६ महिन्यापुरते मर्यादित असतात व हिवाळ्याची सुरूवात होताच ते आपापल्या गांवी परतणे पसंत करतात हेही समजले. हॉटेलमधील कर्मचा-यात स्थानिक महिलांचे प्रमाण लक्षणीय होते तर पुरुष कर्मचारी स्थालांतरित होते असे आढ़ळले. स्थानिक पुरुष वाहतूक व्यवसायात गुंतले असावेत असे दिसते. पर्वतीय प्रदेशात वाहन चालवणे हे विशेष कसबी काम असल्याने त्यात स्थानिक कामगारांची  स्थिती बळकट असणे सहाजिक म्हणावे लागते. पर्यटन क्षेत्राच्या वाढ़ीचे लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेला होण्यासाठी जे रोजगार निर्माण होतील त्यात स्थानिक कारागीर/मजूर यांचा मोठा सहभाग आवश्यक ठरतो. लेह लडाख मधील परिस्थितिवरून राज्याच्या उर्वरित भागाबाबत अंदाज बांधता येतील का असा विचार मनात आला. मात्र लेहहून परतीचा प्रवास करताना श्रीनगर विमानतळावर उतरताना नागरी हवाई वहातूक संचालनालायाच्या सूचनानुसार खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या त्यावरून काश्मीर खो-यातील स्थितीचे वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाले!     







Comments

  1. Also 2nd trip my son on bike royal en field 1 about 5 years back and just now 25th june to 4th july

    ReplyDelete
  2. Gopal Varkhedkar from bangalore

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोविद-१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ?

बँक एकत्रीकरणाचे संभाव्य परिणाम

आणखी एक बँक घोटाळा?