भारतीय प्रजासत्ताकाचे सत्तरावे वर्ष
भारतीय प्रजासत्ताकाचे सत्तरावे वर्ष दोन राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दोन राष्ट्रीय सणांमधील कांही उघड साम्य स्थ ळे आहेत. दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी असते. शा ळा , कॉलेजे आणि सरकारी कार्यालयांत झेंडावंदन होते. संचलने , प्रभातफे-या अशा उत्साहदर्शक कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी होतात. हल्ली महानगरातील सोसायट्यात असेच कार्यक्रम आणि खानपानही केले जाते. पंधरा ऑगस्टला ब्रिटिशांचे राज्य संपले तर सव्वीस जानेवारीला आपण नवीन राज्यघटना स्वीकारली हा फरकही बहुतेकांना माहीत असतोच. पण गुलामी संपली , स्वातंत्र मि ळा ले ही महत्वाची पण भूतका ळा त घडलेली घटना. स्वातंत्रप्राप्तीचा आनंद , स्वातंत्र्यलढयात सहभागी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग , कांहीचे हौतात्म्य यांचे स्मरण , आणि यांबद्दल नवीन पिढीला माहिती देणे या सर्व बाबीही तिच्याशी संबंधित आहेतच. पण या सर्वांचा सबंध भूतका ळा शी आहे. घटना बनविण्याचे काम लवकर आणि यशस्वीरित्या पूर्ण झाले या भूतकालीन घटनेचा आनंद प्रजासत्ताकदि...